शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:07 IST

आपण फॅशन शोचे आयोजन करीत असून, त्या माध्यमातून तुमच्या मुलीला एक्टिव्हा गाडीचे बक्षीस मिळवून देतो. त्यासाठी नोंजणीचे शुल्क, तसेच तुमच्या मुलीला चित्रपटातही काम करण्याची संधी देतो.

नाशिक : आपण फॅशन शोचे आयोजन करीत असून, त्या माध्यमातून तुमच्या मुलीला एक्टिव्हा गाडीचे बक्षीस मिळवून देतो. त्यासाठी नोंजणीचे शुल्क, तसेच तुमच्या मुलीला चित्रपटातही काम करण्याची संधी देतो. चित्रपटाचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत असून, तिच्यासोबत जाणाऱ्या व्यक्तींच्या प्रवासाचा खर्च व राहण्याचा खर्च म्हणून काही रक्कम द्यावी लागेल, असे आमिष दाखवून जळगाव येथील एका व्यक्तीची दोन लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर-राणेनगर परिसरातील एका सायबर कॅफेमध्ये जानेवारी-२०१७ ते मार्च-२०१९ या तीन वर्षांच्या कालावधीत कामठवाडा खुटवटनगर येथील संशयित हर्षद आनंदा सपकाळ याने जळगाव येथील उत्कर्ष सोसायटीत राहणारे अनिल भूजंगराव चिंचोले (५५) यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. संशयितांना चिचोले यांना तुमच्या मुलीला फॅशन शोमध्ये सहभाग घेण्यास सांगा. त्याठिकाणी एक्टिव्हा गाड्या बक्षीस असून, त्यातून तुमच्या मुलीला बक्षीस मिळवून देईल. तसेच कारही मिळवून देईल. त्याच्या रजिस्ट्रेशनसाठी लागणारी फी द्यावी लागेल. त्याचप्रमाणे तुमच्या मुलीला चित्रपटातही काम करण्याची संधी देतो. चित्रपटाची शूटिंग दक्षिण आफ्रिकेत असून, तिच्यासोबत जाणाºया व्यक्तींच्या प्रवासाचा खर्च व राहण्याचा खर्च म्हणून काही रक्कम द्यावी लागेल, असे आमिष दाखवून २ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद अनिल चिंचोले यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्याच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.म्हसरूळमध्ये दोन दुचाकी जाळल्यामखमलाबाद परिसरातील शांतीनगरच्या वेदांत रेसिडेन्सीत एका संशयिताने दोन दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांत रेसिडेन्सीतील सुनील नामदेव जामुदे (२६) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १५ जीटी ३४०१ आणि योगेश अशोक चकोर यांची एमएच ४१ एसी ३७९९ या दोन दुचाकी पार्किंगमध्ये शेजारी पार्क केलेल्या असताना संशयित ज्ञानेश्वर मधुकर शिलवंत याने त्यांना आग लावून नुकसान केल्याचा संशय फिर्यादींनी व्यक्त केला असून, या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार पठाण अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिकfraudधोकेबाजी