वणीच्या बाजारपेठेत कोट्यवधी उलाढाल

By Admin | Updated: November 11, 2015 22:11 IST2015-11-11T22:09:22+5:302015-11-11T22:11:32+5:30

वणीच्या बाजारपेठेत कोट्यवधी उलाढाल

Millennium turnover in Wani's market | वणीच्या बाजारपेठेत कोट्यवधी उलाढाल

वणीच्या बाजारपेठेत कोट्यवधी उलाढाल


वणी : दीपावलीचा सण बाजार म्हणजे मंगळवारीच्या आठवडे बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा व्यावसायिक अंदाज वर्तविण्यात येत असून, सर्वच व्यावसायिक प्रतिष्ठानमधील वर्दळ पाहता वणीच्या बाजारपेठेला यात्रेचे स्वरूप आले आहे.
मंगळवार हा वणीच्या आठवडे बाजाराचा दिवस असून, दिंडोरी व चांदवड तालुक्यातील सुमारे शंभर खेडे, पाडे व गावातील ग्रामस्थ बाजार करण्यासाठी येतात कपड्याची पादत्राणे, खाद्यपदार्थ, सजावट, शोभेच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किराणा या व अशा तत्सम दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
धान्य, भाजीपाला, सूप झाडू विक्रेते यांच्याकडेही लक्षणीय वर्दळ होती. त्यात शहरातील किराणा व कापड दुकानांमध्ये तर रांगा खरेदीसाठी लागल्या होत्या तर मिठाईची दुकाने खाद्यपदार्थांच्या दुकानातही चांगलीच हजेरी खरेदीसाठी होती या सर्व वर्दळीमुळे जत्रेचे स्वरूप आले
होते.
स्थानिकांबरोबर मजूर वर्ग, कामगार, परप्रद्बतीय कुशल कामगार वर्ग, चाकरमाने यांनी खरेदीसाठी विशेष उत्साह दाखविल्याने व्यावसायिक उलाढालीची गती कमालीची वाढल्याचे जाणवत होते. त्यात फटाके व्यावसायिकांची दुकानेही गर्दीने फुलली होती. या सर्व खरेदी
विक्र ीच्या अर्थचक्र ामुळे अर्थ प्रवणतेत कमालीचा वेग आल्याचे दिसून आले. (वार्ताहर)

Web Title: Millennium turnover in Wani's market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.