पेठ येथील यात्रेत लाखोंची उलाढाल

By Admin | Updated: March 21, 2016 23:10 IST2016-03-21T22:42:28+5:302016-03-21T23:10:43+5:30

होळी रे होळीऽऽ : रोजगारासाठी स्थलांतरित आदिवासी मजूर परतण्यास प्रारंभ

Millennium turnover in Peth | पेठ येथील यात्रेत लाखोंची उलाढाल

पेठ येथील यात्रेत लाखोंची उलाढाल

 रामदास शिंदे  पेठ
आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा समजला जाणारा शिमगा म्हणजे होळी सणासाठी रोजगारासाठी स्थलांतरित झालेला आदिवासी मजूरवर्ग आपापल्या गावाकडे परतण्यास प्रारंभ झाला असून, होळीच्या दोन दिवसआधी पेठ शहरात यात्रा भरत असल्याने व्यापारीवर्गाने मालाची मोठ्या प्रमाणावर खरेदी उरकली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
तालुक्यात होळी हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यावेळी आपल्या मायभूमीपासून कामानिमित्त बाहेर पडलेला चाकरमानी व मजूरवर्ग सण जवळ येताच गावाकडे परत येतो, हे मागील कित्येक वर्षापासून सुरू आहे. कालांतराने खेडोपाडी दळणवळणासाठी रस्ते तयार झाले. वाहतुकीची साधने आली तेथील बेरोजगार तरुणांनी किराणा व्यवसायास खेड्यापाड्यातून सुरुवात केली त्यामुळे खेडोपाडी गरजेच्या वस्तू उपलब्ध होऊ लागल्याने यात्रेचा कालावधी वर्षागणिक कमी-कमी होत गेला. येथील यात्रा म्हणजे फक्त लहान बालके, तरुणांसाठी मौज म्हणून उरली आहे तिचा कालावधी अवघा अडीच दिवसांचा उरला आहे. यात्रा सुरू होण्याच्या आधी फक्त पाळणे, चक्री यासारखी खेळण्यांची साधने तेवढे दहा-बारा दिवस आधीपासुन हजेरी लावतात.

Web Title: Millennium turnover in Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.