बांधकाम व्यावसायिकाकडून लाखोंची खंडणी वसुली
By Admin | Updated: January 31, 2016 23:48 IST2016-01-31T23:47:53+5:302016-01-31T23:48:24+5:30
नाशिकरोडमधील घटना : गुन्हा दाखल

बांधकाम व्यावसायिकाकडून लाखोंची खंडणी वसुली
नाशिक : नाशिकरोडमधील बांधकाम व्यावसायिकास धाक दाखवून पाच लाख रुपयांची खंडणी वसूल केल्यानंतर आणखी दहा लाखांची मागणी केल्याप्रकरणी संशयित प्रमोद गुलाब बागुल (आदर्शनगर, जेलरोड) वर उपनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
बांधकाम व्यावसायिक नीलेश विजय काळे (३०, रा. ०५ पद्मिनी सोसायटी, गंधर्वनगरी, नाशिकरोड) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार संशियत प्रमोद बागुल याने लोखंडी रॉडचा धाक दाखवून वेळोवेळी ५ लाख रुपयांची खंडणी वसूल केली़ यानंतर काळे यांच्याकडे पुन्हा दहा लाख
रुपयांची मागणी करून खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली़ तसेच रेजिमेंटल प्लाझामधील काळे यांच्या मालकीच्या दोन गाळ्यांवर कब्जा करून ते भाड्याने दिले होते. (प्रतिनिधी)