नांदगाव-वेहेळगाव रस्त्यावर दुधाच्या धारा

By Admin | Updated: June 3, 2017 00:44 IST2017-06-03T00:44:03+5:302017-06-03T00:44:14+5:30

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील शेतकऱ्यांनी नांदगाव-वेहळगाव रस्तावर भाजीपाला व दूध रस्तावर ओतून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला

The milk stream on Nandgaon-Vheelgaon road | नांदगाव-वेहेळगाव रस्त्यावर दुधाच्या धारा

नांदगाव-वेहेळगाव रस्त्यावर दुधाच्या धारा


लोकमत न्यूज नेटवर्क
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील शेतकऱ्यांनी आज सकाळी नांदगाव-वेहळगाव
रस्तावर भाजीपाला व दूध रस्तावर ओतून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. गुरुवारपासून संपूर्ण राज्यभर शेतकऱ्यांचा संप सुरू असून, नांदगावच्या ग्रामीण भागातील शेतकरीसुद्धा या संपात सहभागी झाले आहेत. संपाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नांदगाव-वेहळगाव रस्तावर शेतकऱ्यांनी भाजीपाला व दूध ओतून आपला रोष व्यक्त केला. दुकान मालकांनी दुकाने बंद संपाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी रामदास आहिरे, गणेश बोरसे साहेबराव बोरसे, अशोक खैरनार, समाधान बोरसे, विजय बोरसे, जगन सुरसे, वसंत बोरसे, एम. डी. बोरसे, अनिल बोरसे, सुदाम बोरसे, आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: The milk stream on Nandgaon-Vheelgaon road