मायलेकींचा विहिरीत पडून मृत्यू
By Admin | Updated: July 26, 2014 00:55 IST2014-07-26T00:04:10+5:302014-07-26T00:55:27+5:30
मायलेकींचा विहिरीत पडून मृत्यू

मायलेकींचा विहिरीत पडून मृत्यू
येवला : तालुक्यातील आंतरवेली येथे दीड वर्षाच्या मुलीसह आई विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवारी (दि. २५) सकाळी घडली.आशाबाई भाऊसाहेब गुंजाळ (२६) या त्यांची दीड वर्षाच्या मुलीसह त्यांच्याच शेताच्या पाठीमागील बाजूस असलेल्या विहिरीत पडून मयत झाली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. (वार्ताहर)