कांदा लागवडीसाठी स्थलांतर
By Admin | Updated: January 3, 2016 22:05 IST2016-01-03T21:57:31+5:302016-01-03T22:05:06+5:30
कांदा लागवडीसाठी स्थलांतर

कांदा लागवडीसाठी स्थलांतर
ब्राह्मणगाव : परिसरात शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने व लागवड केलेली पिके येतील की नाही असा प्रश्न निर्माण झाल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात धाव घेतली आहे. लखमापूर येथे कांदा रोपे मोठ्या प्रमाणात तयार होतात. मात्र या परिसरात पावसाने पाठ फिरविल्याने विहिरींचे पाणी आटू लागले आहे. त्यामुळे कांदा लागवड धोक्यात येत आहे. लागवड मोठ्या प्रमाणात असली तरी पाण्याअभावी कांदा हाती येईलच याची शाश्वती नाही. तेव्हा काही शेतकऱ्यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर व परिसरात कांदा लागवडीसाठी धाव घेतली आहे. (वार्ताहर)