बाजार स्थलांतरित करा
By Admin | Updated: February 13, 2016 23:41 IST2016-02-13T22:44:21+5:302016-02-13T23:41:18+5:30
घोटी : तहसीलदारांचे ग्रामपालिकेला आदेश

बाजार स्थलांतरित करा
घोटी : इगतपुरी तालुक्यातील प्रमुख व्यापारी बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील जुन्या आग्रा महामर्गावर रस्त्यावर व दुभाजकावर बसणाऱ्या भाजीपाला विक्र ेत्यांना पथारीवाल्यांना घोटी ग्रामपंचायतीने स्वतंत्र जागा येत्या आठ दिवसात उपलब्ध करून द्यावी आणि भाजीपाला विक्रीचे मार्केट निर्माण करावे, असे सक्त आदेश इगतपुरीचे तहसीलदार महेंद्र पवार यांच्यासह गटविकास अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.
रस्त्यावर भरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्याबाबत निर्णय घेण्यासाठी इगतपुरी पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी भाजीपाला विक्रेते, ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन यांची तातडीची बैठक ग्रामपालिका कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत.
घोटी शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गाचे विस्तारीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रेते आणि पथारीवाले बसत होते. यामुळे घोटी शहरातील वाहतुकीला सातत्याने अडथळा निर्माण होता. विशेष म्हणजे रस्त्याच्या दुभाजकावरही भाजीपाला विक्रेते दुकान थाटत असल्याने भाजीपाला विक्री जीवघेणी ठरत होती. याबाबत आज घोटी ग्रामपालिकेत सहाय्यक प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भाजीपाला विक्रेते ग्रामपालिका पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत घोटी ग्रामपालिकेने रस्त्यावरील भाजीपाला विक्रीला अंकुश लावण्यासाठी स्वतंत्र भाजीपाला विक्री केंद्र निर्माण करावे आणि भाजी मार्केट येत्या आठ दिवसात स्थलांतर करावे, असे सक्त सूचना दिल्या. (वार्ताहर)