शिवशक्ती चौकात होतोय मध्यरात्री पाणीपुरवठा
By Admin | Updated: May 15, 2017 16:51 IST2017-05-15T16:51:41+5:302017-05-15T16:51:41+5:30
प्रभाग २६ : नागरिकांमध्ये संताप; पाण्याची वेळ बदलण्याची मागणी

शिवशक्ती चौकात होतोय मध्यरात्री पाणीपुरवठा
सिडको : येथील प्रभाग क्रमांक २६ मधील शिवशक्ती चौक परिसरात मध्यरात्री पाणीपुरवठा होत असून, तोही अत्यंत कमी दाबाने होत असल्याने महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची झोप उडाली असून, आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तरी मनपाने याबाबत त्वरित दखल घेत पाणीपुरवठ्याची वेळ बदलण्याबरोबरच सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.