सुरगाण्यात मध्यरात्री बांधकाम पाडले

By Admin | Updated: January 23, 2017 23:18 IST2017-01-23T23:17:59+5:302017-01-23T23:18:21+5:30

सुरगाण्यात मध्यरात्री बांधकाम पाडले

Midnight building in Surgana was demolished | सुरगाण्यात मध्यरात्री बांधकाम पाडले

सुरगाण्यात मध्यरात्री बांधकाम पाडले

सुरगाणा : येथील होळी चौकातील रस्त्यालगत रविवारी दिवसभरात केलेले गाळ्यांचे बांधकाम त्याच मध्यरात्री अज्ञात इसमांनी पाडून टाकल्याने येथे संताप व्यक्त होत आहे. गेल्या महिन्यात १५ डिसेंबरला येथील सुरगाणा-बोरगाव आणि सुरगाणा-उंबरठाण रस्त्या दोनशे मीटर लांबी व वीस मीटर रुंदी कॉँक्र ीट रस्ता करण्यासाठी रस्त्यालगत असलेले अतिक्र मण बांधकाम विभागाने हटविले होते. राबविलेल्या अतिक्र मण निर्मूलन मोहिमेत काही व्यावसायिकांची दुकाने पूर्णत: काढली गेली आहेत, तर काही व्यावसायिकांना थोडीशी जागा शिल्लक राहिली आहे. याच गाळ्यांचे उर्वरित काम दुसऱ्या दिवशी होण्यापूर्वीच रविवारी मध्यरात्रीला अज्ञात इसमांनी ते बांधकाम पूर्णपणे पाडून टाकले. या घटनेमुळे येथे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे जयवंत जाधव यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: Midnight building in Surgana was demolished