शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

म्हसरूळला गोळीबाराची अफवा आणि यंत्रणेची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:45 IST

पंचवटी / नाशिक : म्हसरूळ परिसरात गत काही महिन्यांपूर्वीच झालेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणातील संशयिताचा बदला घेण्यासाठी दोघा संशयितांनी शुक्रवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास गणेशनगरमधील एका दुकानात जाऊन संशयित आरोपीच्या भावावर गोळीबाराचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे़ दरम्यान, म्हसरूळ पोलिसांशी संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले असून, गोळीबाराची अफवा असल्याचा खुलासा केला आहे.

पंचवटी / नाशिक : म्हसरूळ परिसरात गत काही महिन्यांपूर्वीच झालेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणातील संशयिताचा बदला घेण्यासाठी दोघा संशयितांनी शुक्रवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास गणेशनगरमधील एका दुकानात जाऊन संशयित आरोपीच्या भावावर गोळीबाराचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे़ दरम्यान, म्हसरूळ पोलिसांशी संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले असून, गोळीबाराची अफवा असल्याचा खुलासा केला आहे.  गणेशनगर येथील भूषण पगारे याने म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत संशयित विराज पारधी व त्याचा साथीदार यांनी दुपारी दुकानात येऊन काच फोडून नुकसान केल्याचे म्हटले आहे़ या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार म्हसरूळ शिवारातील कलानगरमध्ये काही महिन्यांपूर्वी सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली होती़ या घटनेतील एक संशयित गणेशनगरमध्ये राहत असून, खुनाचा बदला घेण्यासाठी दुपारी पारधी आपल्या साथीदारासह आला होता़ दरम्यान, या घटनेनंतर म्हसरूळमध्ये गोळीबार झाल्याची चर्चा पसरल्याने म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र शार्दुल, उपनिरीक्षक संजय पवार, संजय राऊत व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संपूर्ण चौकशी केल्यानंतर गोळीबाराची अफवा असल्याचे सांगितले. संशयित मोरे गॅँगचे हस्तक दुकानातील काच फोडणारे संशयित हे मयत सराईत गुन्हेगार निखिल ऊर्फ बाल्या मोरे याचे हस्तक असल्याची चर्चा आहे़ काही महिन्यांपूर्वी सराईत गुन्हेगार मोरेचा पाच ते सहा संशयितांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना दिंडोरीरोडवरील कलानगर परिसरात घडली होती. या खून प्रकरणातील संशयित रोशन पगारे हा गणेशनगर परिसरातील असून, शुक्रवारी (दि़ ८) दुपारी दोघा संशयितांनी त्याच्या दुकानात जाऊन काच फोडून वचपा काढण्याचा प्रयत्न केला. संशयित मोरेचे हस्तक असल्याची माहिती एका पोलीस कर्मचाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा