शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
3
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
4
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
5
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
6
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
7
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
8
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
9
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
10
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
11
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
12
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
13
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
14
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
15
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
16
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
17
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
18
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
19
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
20
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
Daily Top 2Weekly Top 5

म्हसरूळला दोन मोटारींची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:17 IST

शहर व परिसरात मध्यरात्री, पहाटेच्या सुमारास अज्ञात गावगुंडांकडून घरांसमोर उभी असलेली वाहने लक्ष्य केली जात आहेत. म्हसरूळ परिसरात अशाच प्रकारे दोन मोटारींच्या काचा फोडून गावगुंडांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे दहशत पसरविण्याचा प्रयत्न

नाशिक : शहर व परिसरात मध्यरात्री, पहाटेच्या सुमारास अज्ञात गावगुंडांकडून घरांसमोर उभी असलेली वाहने लक्ष्य केली जात आहेत. म्हसरूळ परिसरात अशाच प्रकारे दोन मोटारींच्या काचा फोडून गावगुंडांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर व परिसरात कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून, नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून कोम्बिंग, मिशन आॅल आउट यांसारख्या मोहिमा राबविल्या जात असल्या तरी गुन्हेगारी अद्याप नियंत्रणात आलेली नाही. नाकाबंदीमधून केवळ हेल्मेट परिधान न करणाऱ्या सर्वसामान्यांना पोलिसांकडून अडविले जात असून, त्यांची झाडाझडती केली जात आहे; मात्र शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.दिंडोरीरोडवरील सावरकर उद्यानाजवळील श्री गणराज बंगल्याबाहेर उभ्या असलेली अक्षय प्रकाश धात्रक यांची स्कॉर्पिओ (एमएच १५, बीडी ७७८१) व प्रशांत श्यामराव जोशी यांची फिगो (एमएच १५, ईबी ७६२६) ही वाहने अज्ञात इसमांनी दगडफेक करून शनिवारी (दि.१५) मध्यरात्री फोडली. दोन्ही वाहनांच्या समोरच्या काचा फुटल्या आहेत. सकाळी जेव्हा वाहनमालक झोपेतून उठले तेव्हा त्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ सदर घटना म्हसरूळ पोलिसांना कळविली. या प्रकरणी वाहनमालकांनी म्हसरूळ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.नागरिकांची वाहने दारापुढे तसेच रस्त्यांवरही सुरक्षित नसून चार ते पाच दिवसांपूर्वी सरकारवाडा, मुंबई नाका, गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत गजबजलेल्या ठिकाणी उभ्या असलेल्या मोटारींच्या काचा फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले होते. त्यापूर्वी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत नारायणबापूनगर परिसरात चोरट्यांनी मध्यत्ररात्री धुडगूस घालत रहिवाशांच्या सात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविली होती.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी