डॉ. हिरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नाशिकमध्ये मेट्रो किंवा रॅपिड रेल्वे सुरू करण्यासाठी आपण महापालिका व विधानसभेत पाठपुरावा केला होता, तसेच केंद्रात रेल्वेमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली होती.
आता केंद्राने नाशिक शहराच्या निओ मेट्रो प्रकल्पासाठी तरतूद केल्याने नाशिक शहराचा विकास होणार आहे. या मेट्रो प्रकल्पात सिडको भागाचा समावेश करण्यात यावा तसेच नाशिक एअरपोर्टवर विमानाची संख्या वाढत असल्याने निओ मेट्रो एअरपोर्ट भागाशी जोडली गेली पाहिजे. नाशिक शहराच्या चारही बाजूला पूर्वी कॅनॉल होते. सध्या काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे, तर काही ठिकाणी जॉगिंग पार्क उभारले आहेत. सदर जागा शासनाची आहे. या जागेवर निओ मेट्रो सुरू केल्यास रस्त्यासाठी लागणाऱ्या जमिनीसाठी मोबदला देण्याची गरज नसल्याचे डॉ. हिरे यांनी सांगितले.