गाड्या़ ‘वर्ल्ड जावा डे’ला पाणी वाचवण्याचा संदेश

By Admin | Updated: July 14, 2014 00:32 IST2014-07-14T00:12:26+5:302014-07-14T00:32:30+5:30

गाड्या़ ‘वर्ल्ड जावा डे’ला पाणी वाचवण्याचा संदेश

Message to save water to trains 'World Java Day' | गाड्या़ ‘वर्ल्ड जावा डे’ला पाणी वाचवण्याचा संदेश

गाड्या़ ‘वर्ल्ड जावा डे’ला पाणी वाचवण्याचा संदेश

नाशिक : एकापेक्षा एक सरस गाड्या, जुन्यात जुनी मॉडेल्स, कडक आवाज अशी शानदार सवारी पाहण्यासाठी नाशिककरांनी आज गर्दी केली होती़ पाणी वाचविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा संदेश देत मोठ्या उत्साहात नाशिककरांनी वर्ल्ड जावा डे साजरा केला़
गंगापूर रोडवरील बॉस्को सेंटर येथे हा कार्यक्रम पार पडला़ विशेष पोलीस अधीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या हस्ते फ ीत कापून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला़ गाड्यांची आवड जपताना दुर्मीळ झालेल्या यझदी गाड्यांचा संग्रह करून त्यांची देखभाल करून नव्या पिढीला पाहण्यासाठी उपलब्ध केल्या आहेत़ यासह सामाजिक उपक्र मांमधून संदेश देत सामाजिक कार्याला हातभार लावण्याचा यझदी क्लबचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत यावेळी साळुंखे यांनी व्यक्त केले़
याप्रसंगी नाशिक येथील यझदी जावा क्लबच्या ११०, तर मुंबई येथील क्लबच्या १८ सदस्यांनी या कार्यक्रमात सहभागी होत आपल्या गाड्या नाशिककरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या होत्या़ यामध्ये संपूर्ण भारतात दोनच असलेल्या बायझा मॉडेल व बेबी यझदी, यझदी ३५० सीसी, डिलक्स सीसी, क्लासिक २, रेडकिंग यांसह विविध मॉडेल्स उपलब्ध करण्यात आले होते़ तसेच याप्रसंगी पाणी वाचवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग करा, असा संदेश उपस्थित नागरिकांना दिला जात होता़ तसे फलक कार्यक्रम स्थळी लावण्यात आले होते़
याप्रसंगी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी़ बी़ चांडक, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, रोटरी क्लब आॅफ नॉर्थचे अध्यक्ष किरण सागोरे, विसाचे अध्यक्ष अश्विन पंडित, विजय देशपांडे आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Message to save water to trains 'World Java Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.