शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

ओटीभरण कार्यक्र मातून वृक्ष संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:31 AM

येवला : एकात्मिक बाल विकास प्रकल्प २ अंतर्गत तालुक्यातील धुळगाव येथील भीमनगरमधील अंगणवाडी क्रमांक चारमध्ये गरोदर मातांचा ओटीभरण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी अंगणवाडी मदतनीस रिना विनेश गायकवाड व आशा कार्यकर्ते वालूबाई जगताप यांनी महिलांना रोपटे वाटप करून लहान बाळासारखेच या झाडांचे संवर्धन व संगोपन करण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.

ठळक मुद्दे बचतगटांच्या महिला व गरोदर मातेला यावेळी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन

येवला : एकात्मिक बाल विकास प्रकल्प २ अंतर्गत तालुक्यातील धुळगाव येथील भीमनगरमधील अंगणवाडी क्रमांक चारमध्ये गरोदर मातांचा ओटीभरण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी अंगणवाडी मदतनीस रिना विनेश गायकवाड व आशा कार्यकर्ते वालूबाई जगताप यांनी महिलांना रोपटे वाटप करून लहान बाळासारखेच या झाडांचे संवर्धन व संगोपन करण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.यावेळी गरोदर मातेची ओटी भरताना उपस्थित स्थानिक बचतगटांच्या महिला व गरोदर मातेला यावेळी राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून ओटीभरण कार्यक्रमास सुरुवात झाली. गर्भवती मातेचे ओटीभरण करणे ही प्राचीन रूढी, परंपरा आजही समाजजीवनात टिकून आहे. ही भारतीय लोकसंस्कृतीतील महिलांच्या जीवनातील प्रमुख रूढी परंपरा आहे. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवचैतन्य बहरून नवनवीन नवनिर्मितीचे सामर्थ्य आहे, त्याचप्रमाणे स्रियांच्या उदरात वंशवृद्धीचे सामर्थ्य आहे.ओटी भरून गरोदर मातेला केलेले अभीष्टचिंतन म्हणजेच ओटीभरण असते,असे आशा स्वयंसेविका कार्यकर्ती वालूबाई जगताप त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले.शासनाच्या वतीने वृक्ष महोत्सव सप्ताह साजरा करीत असताना येथील भीमनगर- मध्येही झाडे लावा-झाडे जगवा हा संदेश आपल्या कृतीतून दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी रिना गायकवाड यांनी सांगितले. यावेळी वालूबाई जगताप, उज्ज्वला गायकवाड, सोनाली गायकवाड, सुनीता गायकवाड, सपना गायकवाड, वैशाली पैठणकर, माळसा पळसकर, रेणुका गायकवाड, सिंधूबाई गांगुर्डे, कल्पना गायकवाड, सारिका गायकवाड, जनाबाई पगारे, कांताबाई गायकवाड, शीतल गायकवाड, लंका गायकवाड, पल्लवी मांजरे, नंदा सोनवणे आदी महिला उपस्थित होत्या. गर्भवती मातेचे ओटीभरण करणे ही प्राचीन रूढी परंपरा आजही समाजजीवनात टिकून आहे. ही भारतीय लोकसंस्कृतीतील महिलांच्या जीवनातील प्रमुख रूढी परंपरा आहे. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवचैतन्य बहरून नवनवीन नवनिर्मितीचे सामर्थ्य आहे त्याचप्रमाणे स्रियांच्या उदरात वंशवृद्धीचे सामर्थ्य आहे.शासनाच्या वतीने वृक्षमहोत्सव सप्ताह साजरा करीत असताना येथील भीमनगरमध्येही झाडे लावा- झाडे जगवा हा संदेश आपल्या कृतीतून दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी रिना गायकवाड यांनी सांगितले.