पत्नीच्या बदनामीचे मोबाइलवर संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:57 IST2017-10-16T00:56:49+5:302017-10-16T00:57:56+5:30
नाशिक : संकेतस्थळावरून पत्नीच्या चारित्र्याविषयक संदेश पतीच्या मोबाइलवर पाठवून बदनामी केल्याचा प्रकार सिडकोत घडला आहे़

पत्नीच्या बदनामीचे मोबाइलवर संदेश
नाशिक : संकेतस्थळावरून पत्नीच्या चारित्र्याविषयक संदेश पतीच्या मोबाइलवर पाठवून बदनामी केल्याचा प्रकार सिडकोत घडला आहे़ अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको परिसरातील एका विवाहितेच्या पतीच्या मोबाइलवर इन्फो एसएमएस या संकेतस्थळावरून २१ जून २०१७ रोजी संदेश पाठविण्यात आले़ या संदेशांमध्ये विवाहितेची बदनामी केलेली होती़ या संदेशामुळे विवाहितेच्या मनात भीती तसेच लज्जा उत्पन्न होऊन मानसिक त्रास दिला़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान गुन्हा दाखल करण्यात आला आहे़