नाशिक जिल्हयात गणरायाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 15:46 IST2018-09-24T15:45:46+5:302018-09-24T15:46:06+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे जय बजरंग क्रि डा मंडळ व भैरवनाथ मिञ मंडळाच्या वतीने ढोलताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुक काढण्यात आली .

नाशिक जिल्हयात गणरायाला निरोप
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे जय बजरंग क्रि डा मंडळ व भैरवनाथ मिञ मंडळाच्या वतीने ढोलताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुक काढण्यात आली .
जय बजरंग क्रि डा मंडळाच्या वतीने माधव महाराज काजळे यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्र म व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या मुलांना मंडळाच्या वतीने बक्षिस वितरण करण्यात आले. सजवलेल्या ट्रॅक्टरमधून गणरायाच्या मिरवणूकीला सुरूवात झाली.मिरवणूकीमध्ये सादर केलेले काही जिवंत देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. तालावर ठेका धरत मिरवणुक पुढे सरकत होती. शेवटी गणरायाची सामुहिक आरती करु न दारणा धरण येथे विसर्जन करण्यात आले.या मिरवणूकीमध्ये वाडिव-हे येथील पोलिस स्टेशनच्या पोलिस कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.त्यांच्या या सहकार्यामुळे मिरवणुक अतिशय शांततेत पार पडली असून दोन्हीही मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.