मेशी फाटा रस्ता कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 17:02 IST2021-01-30T17:00:49+5:302021-01-30T17:02:08+5:30

मेशी : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मेशी ते मेशी फाटा या तीन किलोमीटर रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.

Meshi fork road work started | मेशी फाटा रस्ता कामास प्रारंभ

मेशी फाटा रस्ता कामास प्रारंभ

ठळक मुद्देनागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मेशी : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मेशी ते मेशी फाटा या तीन किलोमीटर रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. या                            रस्त्याच्या कामाचे उद‌्घाटन उमराणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य यशवंत शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली होती. रस्त्यात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहानचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मागील वर्षीच कामाला मंजुरी मिळाली होती, परंतु निधीअभावी काम सुरू होण्यास विलंब होत होता. म्हणून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर काम सुरू झाले आहे त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

याप्रसंगी देवळा पंचायत समितीचे माजी उपसभापती केदा शिरसाठ, केदा शिरसाठ, सरपंच सुनंदा आहिरे,उपसरपंच भिका बोरसे, बापू जाधव, राजू शिरसाठ, शाहू शिरसाठ,श्रीराम बोरसे उपस्थित होते.

Web Title: Meshi fork road work started