शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

पारा तापदायक : उन्हाच्या झळांनी नाशिककर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 21:29 IST

एकूणच नाशिक ऊन्हामुळे तापले आहे. कमाल तपमानाबरोबर किमान तपमानही वाढत असल्याने वातावरणात कमालीचा उष्मा जाणवू लागला आहे.

ठळक मुद्देमालेगावमध्ये कमाल तपमान ४०.२ नाशिकमध्ये ३८.५ इतक्या कमाल तपमानाची नोंद नागरिक शक्यतो बारा वाजेनंतर घराबाहेर पडणे टाळत आहे

नाशिक : मार्चअखेर शहरासह जिल्ह्यात ऊन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवत असल्याने नाशिककर हैराण झाले आहे. कमाल तपमानाचा पारा पस्तीशीच्या पुढे सरकला असून मंगळवारी (दि.२७) मालेगावमध्ये कमाल तपमान ४०.२ अंश तर नाशिकमध्ये ३८.५ इतक्या कमाल तपमानाची नोंद हवामान निरिक्षण केंद्राने केली.चालू महिन्याचा पंधरवडा उलटत नाही तोच उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्यास सुरूवात झाली. नाशिक शहराचे तपमान तीस अंशापुढे सरकण्यास सुरूवात झाली. कमाल तपमानात सातत्याने वाढ होऊ लागल्याने नाशिककरांना उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. वीस मार्चपासून कमाल तपमानाचा पारा पस्तीशीपर्यंत सरकला आणि आता मार्चअखेर तपमान जिल्ह्यात चाळीशीपर्यंत पोहचले आहे तर शहरात चाळीशीच्या जवळपास आले आहे. एकूणच नाशिक ऊन्हामुळे तापले आहे. कमाल तपमानाबरोबर किमान तपमानही वाढत असल्याने वातावरणात कमालीचा उष्मा जाणवू लागला आहे. हवेतील गारवा जवळपास संपुष्टात आला असून दुपारनंतर वारादेखील उष्ण स्वरुपाचा वाहू लागल्याचे जाणवत आहे. त्यामुळे नागरिक शक्यतो बारा वाजेनंतर घराबाहेर पडणे टाळत आहे. घराबाहेर पडताना नाशिककर योग्य ती खबरदारी घेताना दिसून येत आहे.शहराचे वाढत्या कमाल तपमानामुळे उकाडाही प्रचंड जाणवत आहे. उन्हाच्या तीव्रता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. तपमानाचा पारा एप्रिलच पहिला आठवड्यासंपल्यानंतर काहीसा खाली उतरण्यास सुरूवात होईल. मागील वर्षी २७ मार्च रोजी शहराचे तपमान ४०.३ इतके नोंदविले गेले होते. तसेच २९ मार्चपर्यंत सलग चाळीशीवर कमाल तपमानाचा पारा स्थिरावलेला होता. त्यामुळे यंदाही कमाल तपमानाची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. कारण पारा चाळीशीच्या जवळपास आला आहे. वाऱ्याचा वेग वाढल्यास कमाल तपमानात काहीशी घट होण्याची आशा आहे. मात्र गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यामधील कमाल तपमानाची आकडेवारी बघता पारा पस्तीशीच्या जवळपास राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकूणच पुढील दोन महिने नाशिकरांना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

साप्ताहिक कमाल तपमान असे...(अंशात)

दिनांक -      तपमान२१ -               ३३.८२२ -              ३३.०२३ -              ३३.७२४ -              ३६.३२५ -              ३७.३२६ -              ३८.१२७ -              ३८.५

टॅग्स :NashikनाशिकHeat Strokeउष्माघातTemperatureतापमान