पारा पुन्हा ३८ अंशावर
By Admin | Updated: April 27, 2017 18:30 IST2017-04-27T18:30:48+5:302017-04-27T18:30:48+5:30
शहराच्या कमाल तपमानाचा पारा ४१ अंशावरून थेट ३४ अंशापर्यंत घसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता.

पारा पुन्हा ३८ अंशावर
नाशिक : शहराच्या कमाल तपमानाचा पारा ४१ अंशावरून थेट ३४ अंशापर्यंत घसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मागील चार दिवसांपासून वातावरण अल्हाददायक वाटत होते आणि वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे उष्म्याची तीव्रता जाणवत नव्हती; मात्र गुरूवारी (दि.२७) तपमानाचा पारा पुन्हा ३८ अंशावर पोहचल्याने नाशिककरांना उन्हाचा चटका जाणवला.
वाऱ्याचा वेग वाढल्याने पारादेखील दोन घसरून 34 अंशांवर आला. यामुळे नाशिककरांना अल्पसा दिलासाही मिळाला होता. आठवडाभरापासून नाशिकच्या कमाल तपमान चाळिशीपार होते. तीन दिवसांमध्ये पारा केवळ दोन अंशांनी खाली सरकला होता. नाशिकचे हवामान दिवस-रात्र उष्ण राहत आहे. यामुळे नागरिकांना रात्रीदेखील उष्म्यापासून दिलासा मिळणे अवघड होत असून, उकाड्याच्या सामना करत झोप काढावी लागत आहे. हवामानातही उष्णता जाणवत आहे. किमान तपमानाचा पारा सलग काही दिवसांपासून १५ अंशाच्या पुढे राहत आहे. त्यामुळे नाशिककर घामाघूम झाले असून, उष्णतेपासून दिलासा मिळविण्यासाठी थंड पाणी, शीतपेयांच्या वापराबरोबरच वातानुकूलित यंत्र, पंखे, कुलरचाही वापर सर्वाधिक होऊ लागला आहे.