पारा 9.4 अंशांवर
By Admin | Updated: January 6, 2016 00:26 IST2016-01-06T00:19:02+5:302016-01-06T00:26:10+5:30
राज्यात नीचांकी तपमान : थंडीत वाढ

पारा 9.4 अंशांवर
नाशिक : डिसेंबर महिन्यात नाशिककरांनी कडाक्याची थंडी अनुभवली. पारा थेट ५.४ पर्यंत घसरल्याने नाशिककर गारठले होते; मात्र त्यानंतर हळूहळू नाशिककरांना थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला होता; मात्र सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.५) दोन अंशांनी तपमानात घट झाली असून, ९.४ अंश इतक्या किमान तपमानाची नोंद झाल्याने नाशिक पुन्हा राज्यात सर्वाधिक कमी तपमान असलेले शहर ठरले आहे. डिसेंबरच्या उत्तरार्धात तपमानाचा पारा थेट ९ अंशांपर्यंत सरकल्याने थंडीची तीव्रता कमी झाल्याचा अनुभव नाशिककरांना आला होता; परंतु दोन दिवसांपासून शहर पुन्हा गारठण्यास सुरुवात होऊ लागली आहे. सोमवारी राज्यात अहमदनगरचा पारा (९.४) व नाशिक (९.६) असे नीचांकी तपमान नोंदविले गेले होते; मात्र आज अहमदनगरच्या तपमानात वाढ झाली असून, नाशिकचे तपमान घसरले आहे. ९.४ अंशांवर तपमान गेल्याने नाशिककरांनी मंगळवारी संध्याकाळनंतर कडाक्याची थंडी अनुभवली.