शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पारा ७.६ : राज्यात नाशकात नीचांकी तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:21 IST

शहराचे किमान तापमान ७.६ अंशांपर्यंत तर कमाल तापमान २६ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली.

ठळक मुद्देमागील आठवड्यात पारा थेट ५.१ अंशांपर्यंत यावर्षी नाशिककर थंडीने चांगलेच गारठले.

नाशिक : शहराचे किमान तापमान ९.७ तर कमाल तापमान ३१ अंशांपर्यंत सरकले होते. त्यामुळे नाशिककरांना थंडीपासून अंशत: दिलासा मिळाला होता. मात्र सोमवारी (दि.७) शहराचे किमान तापमान ७.६ अंशांपर्यंत तर कमाल तापमान २६ अंशांपर्यंत घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली.जम्मू-काश्मीरमध्ये मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर-मध्य महराष्टÑात पुन्हा शीतलहर आली आहे. हवामान खात्याकडून दोन दिवस थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा शनिवारी देण्यात आला होता. काश्मीर खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे तेथील तापमानाचा पारा उणे ४ ते उणे ११ अंशांपर्यंत घसरला आहे. गुलबर्गमध्ये उणे ११, पहेलगाममध्ये उणे १३.६ तर श्रीनगरमध्ये उणे चार अंशांपर्यंत किमान तापमान सोमवारी नोंदविले गेले. बर्फ वृष्टीचा थेट परिणाम पुन्हा उत्तर महाराष्टÑावर होऊ लागला असून, नाशिक गारठण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान नाशिकमध्ये ७.६ अंश इतके नोंदविले गेले तर अहमदनगरमध्ये ८.४, पुणे ९.२, मालेगाव, जळगावमध्ये ९.४ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. नागपूर, अमरावती, गोंदिया, उस्मानाबाद, सातारा आदी शहरांचे तापमान दहा अंशांच्या पुढे सरकल्याने थंडीपासून तेथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.यावर्षी नाशिककर थंडीने चांगलेच गारठले. मागील आठवड्यात पारा थेट ५.१ अंशांपर्यंत घसरल्याने नागरिक थंडीने हैराण झाले होते. थंडीच्या तीव्रतेमुळे नागरिकांना आता थंडी नकोनकोशी वाटू लागली आहे. सोमवारी कमाल व किमान तापमान घसरल्याने पहाटेपासून थंडी जाणवत होती. दिवसभर प्रखर ऊन जरी शहरात पडले होते तरी थंड वाºयाचा वेग वाढल्यामुळे वातावरणात गारठा जाणवत होता. संध्याकाळी पुन्हा थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांना हुडहुडी भरली होती. त्यामुळे नागरिकांकडून शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमानNashikनाशिक