शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पारा ११अंशावर : शहरात वाढला थंडीचा कडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 13:54 IST

नाशिककरांना दिवसभर हवेत गारवा जाणवत नसला तरीदेखील सुर्यास्त होताच नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येण्यास सुरुवात होते. रात्री थंडीची तीव्रता अधिक वाढते तसेच पहाटेसुध्दा सुर्योदयापर्यंत वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झालेला असल्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरत आहे.

ठळक मुद्देबोचऱ्या थंडीचा नाशिककरांना अनुभवउत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढला

नाशिक : शहर व परिसरात थंडीने जोरदार पुनरागमन केले आहे. मागील चार दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली असल्याने वातावरणात गारठा जाणवू लागला आहे. किमान तापमानाचा पारा दिवसेंदिवस घसरु लागला आहे. गुरुवारी (दि.२८) ११ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. सर्वाधिक नीचांकी किमान तापमान निफाडमध्ये ८.८अंशापर्यंत खाली घसरले. निफाड तालुका थंडीच्या कडाक्याने चांगलाच गारठला आहे.आठवडाभरापासून नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढू लागल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. गेल्या गुरुवारीदेखील किमान तापमान ११.४ अंश इतके होते. सोमवारी मात्र अचानकपणे पारा १०.४अंशापर्यंत खाली घसरला होता. आठवडाभर किमान तापमान १४अंशाच्यापुढे सरकलेले नाही. यामुळे हा आठवडा थंडीची तीव्रतेची जाणीव करुन देणारा ठरला. पहाटे तसेच रात्रीच्या सुमारास वातावरणात गारठा अधिक जाणवत आहे. निरभ्र आकाशामुळे दिवसभर लख्ख प्रखर असा सुर्यप्रकाश राहत असल्याने कमाल तापमानाचा पारादेखील संध्याकाळपर्यंत ३० किंवा ३१ अंशापर्यंत वर सरकत आहे. नाशिककरांना दिवसभर हवेत गारवा जाणवत नसला तरीदेखील सुर्यास्त होताच नागरिकांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येण्यास सुरुवात होते. रात्री थंडीची तीव्रता अधिक वाढते तसेच पहाटेसुध्दा सुर्योदयापर्यंत वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झालेला असल्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरत आहे. कोरोनाच्या सावटामुळे गेल्या वर्षी शाळांची घंटा वाजलीच नव्हती. प्राथमिक, माध्यमिक शाळा आता पुन्हा सुरु झाल्याने सकाळी थंडीच्या कडाक्यात शाळांमध्ये जाणाऱ्या चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांची लगबग पहावयास मिळत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी चिमुकले उबदार कपड्यांचा वापर करत पुन्हा 'धडे' गिरविण्यासाठी शाळांचा उंबरा ओलांडत आहे.उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढला असून दिल्लीमध्ये थंडीचा प्रकोप वाढल्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्राच्याही वातावरणावर होताना दिसत आहे. पुढील काही दिवस नाशिक शहर व परिसरात थंडीची तीव्रता अशीच कायम राहणार असून किमान तापमानात अधिक घसरण होण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तविली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमान