शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पारा १०.२ अंशावर : कडाक्याच्या थंडीपासून नाशिककरांना अंशत: दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 15:44 IST

फेब्रुवारीपर्यंत थंडीची तीव्रता कमी झालेली असते आणि उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरूवात होते; मात्र यावर्षी ऋु तूमानाचे चक्र बदलल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.

ठळक मुद्देवातावरणात गारवा टिकून आहे. सुर्योदय होताच तीव्रता कमी झाली.

नाशिक : कडाक्याच्या थंडीपासून नाशिककरांना सोमवारी (दि.११) अंशत: दिलासा मिळाला. सकाळी किमान तापमानाचा पारा १०.५ अंशापर्यंत वर सरकला. रविवारी शहराचे किमान तापमान ५अंशावर होते. तापमानात वाढ झाल्याचे दिसत असले तरी नाशिकचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता तापमान १३ अंशाच्या पुढे गेल्यानंतरच वातावरणात उष्मा जाणवतो.पाच दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका प्रचंड वाढला होता. शुक्रवारी (दि.९) हंगामातील सर्वाधिक नीचांकी ४ अंश इतकी किमान तापमानाची नोंद झाली. डिसेंबर महिन्यात शहराचा पारा ५.३ अंशापर्यंत खाली घसरला होता. जम्मू-काश्मिरमध्ये बर्फवृष्टीचा जोर वाढल्याने उत्तरेकडून येणारी शीतलहरीने महाराष्टÑाला सर्वाधिक प्रभावीत केले. थंड वारे अधिक वेगाने वाहू लागले होते. तसेच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे थंडीचा जोर वाढला होता. त्यामुळे यावर्षी चक्क फेब्रुवारीमध्ये थंडीचा कडाका नागरिकांनी अनुभवला व सर्वाधिक नीचांकी किमान तापमान नोंदविले गेले. फेब्रुवारीपर्यंत थंडीची तीव्रता कमी झालेली असते आणि उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरूवात होते; मात्र यावर्षी ऋु तूमानाचे चक्र बदलल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.डिसेंबरच्या पंधरवड्यापासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नाशिककरांना यंदा तीव्र थंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे थंडीच्या कडाक्याने नागरिक जेरीस आले आहे.  वातावरणात उष्मा तयार होत नसल्यामुळे वातावरणात गारवा टिकून आहे. आठवडाभरापासून किमान तापमानासह कमाल तापमानदेखील घसरल्याने थंडीचा कहर नाशिकमधये अनुभवयास आला. सायंकाळपासूनच शेकोट्या पेटवू लागल्या होत्या. सोमवारी मात्र थंडीपासून काहीसा दिलासा मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान दिसून आले. पहाटे थंडीची तीव्रता जाणवत होती; मात्र सुर्योदय होताच तीव्रता कमी झाली. तीन दिवसांपासून दिवसभर जाणवणारा बोचरा वारा सोमवारी नागरिकांना जाणवला नाही. त्यामुळे थंडीपासून काही अंशी तरी दिलासा मिळाल्याची चर्चा नागरिकांत सुरू होती.

टॅग्स :NashikनाशिकweatherहवामानTemperatureतापमान