व्यापारी बँकेची शनिवारी वार्षिक सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST2021-09-24T04:17:07+5:302021-09-24T04:17:07+5:30
सभासद संख्या ७२ हजार ५६८ आहे. मागील इतिवृत्त मंजूर करणे, ताळेबंद, नफातोटा पत्रकाला व लेखापरीक्षण अहवालाला स्वीकृती ...

व्यापारी बँकेची शनिवारी वार्षिक सभा
सभासद संख्या ७२ हजार ५६८ आहे. मागील इतिवृत्त मंजूर करणे, ताळेबंद, नफातोटा पत्रकाला व लेखापरीक्षण अहवालाला स्वीकृती देणे, एक कोटी रक्कम बुडीत व संशयित निधीत वर्ग करणे, अंदाजपत्रकास मंजुरी देणे, एमडी पदाकरिता बाबासाहेब जाधव यांच्या नियुक्तीस मंजुरी देणे, बॅंकेचे संचालक व नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे आदी विषयांवर चर्चा होईल. बॅंकेने व्यावसायिक, नोकरदार, ग्राहक-कर्जदार यांच्यासाठी अत्यल्प व्याजदराने ५० हजार ते २५ लाखांपर्यंतची कोविड-१९ आधार स्पेशल कर्जयोजना सुरू केली आहे. २४४ खातेदारांनी तिचा लाभ घेतला आहे. सभासदांना चॅट बॉक्सव्दारे सभेत प्रश्न उपस्थित करता येईल. पत्रकार परिषदेला संचालक वसंत अरिंगळे, प्रकाश घुगे, सुनील चोपडा, डॉ. प्रशांत भुतडा, रमेश धोंगडे, सुनील आडके, श्रीराम गायकवाड, मनोहर कोरडे, अरुण जाधव, रामदास सदाफुले आदी उपस्थित होते.