व्यापाऱ्याची दीड कोटींची फसवणूक
By Admin | Updated: January 13, 2017 00:58 IST2017-01-13T00:58:29+5:302017-01-13T00:58:40+5:30
शेअर्सचे आमिष : ज्येष्ठ दाम्पत्याचा प्रताप

व्यापाऱ्याची दीड कोटींची फसवणूक
नाशिक : कंपनीचे संचालकपद बहाल करून शेअर्स नावावर करण्याचे आमिष दाखवून कॅ नडा कॉर्नर येथील एका ज्येष्ठ दाम्पत्याने सुमारे एक कोटी ५८ लाख ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कॅनडा कॉर्नरवरील कॅनडा टॉवर्स सोसायटीमध्ये राहणारे चंद्रशेखर श्रीरामसिंग परदेशी (६०) व त्यांच्या पत्नी मीरा परदेशी (५५) यांनी ठाणे येथील रहिवासी असलेला अमीन पिरमहंमद मर्चंट यांच्याशी ओळख करून घेत
त्यांना एका हॉस्पिटॅलिटी खासगी कंपनीचे संचालकपद देऊन काही शेअर्स नावावर करण्याचे आमिष दाखविले.
२८ फेब्रुवारी २०१२ ते १६ मार्च २०१६ या कालावधीत संशयित चंद्रशेखर व त्यांच्या पत्नीने आय होप हॉस्पिटॅलिटी नावाची कंपनी स्थापन केली होती. या संशयितांनी मर्चंट यांना कंपनीमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यांनी दिलेल्या आमिषापोटी मर्चंट यांनी वेळोवेळी या कालावधीत सुमारे एक कोटी ५८ लाख ११ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर संशयित ज्येष्ठांनी मर्चंट यांची कंपनीच्या संचालकपदी नियुक्ती केली. मर्चंट यांचा मुलगा आफताब याने सदर संशयित दाम्पत्याकडे वडिलांनी गुंतविलेल्या रकमेची मागणी केली असता
त्यांनी नकार दिला. (प्रतिनिधी)