नाशिक : मित्राला भेटण्यासाठी गेलेल्या व्यापाऱ्याचे जमिनीच्या वादातून सहा संशयितांनी अपहरण करून खिशातील रक्कम व सोन्याचे अंगठ्या काढून घेतल्यानंतर एका खोलीत डांबून मारहाण करीत कोऱ्या चेकवर स'ा घेऊन सोडून दिल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये नुकत्याच भाजपात प्रवेश केलेल्या एका मोठ्या नेत्याचा पुतण्याचा समावेश आहे़ पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आडगाव येथील गट नंबर ६६३ वरील जमीनीच्या वादातून टाकळी रोडवरील गोडेबाबानगर येथील रामपूरबाबा रो-हाऊसमध्ये राहणारे व्यापारी भास्कर श्यामराव पाटील(५४) यांचे संशयित भास्कर देवचंद पाटील, बाळासाहेब भगवान पाठक, अजय बागुल, परेश (पूर्ण नाव माहिती नाही) व त्यांचे दोन साथीदार यांनी शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पेठरोडवरील जुईनगरमधून अपहरण केले़
जमिनीच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरण करून मारहाण :
By admin | Updated: November 23, 2014 00:20 IST