शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीवर दीड कोटी खर्च?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:27 IST

उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या नागरी सहकारी असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सुमारे दीड कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सातपूर : उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या नागरी सहकारी असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सुमारे दीड कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापूर्वी एका निवडणुकीत अतिरिक्त खर्च करणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या विरोधात बॅँकेने न्यायालयात दाद मागितली होती.नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य समजल्या जाणाºया नाशिक मर्चंट बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने अनियमितता ठपका ठेवत संचालक मंडळ बरखास्त केले आणि जानेवारी २०१४ रोजी आरबीआयचे गोवा आणि महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त प्रादेशिक निर्देशक जे.बी. भोरिया यांची बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. तर बँकेवर प्रशासक नेमल्याची वार्ता सगळीकडे वाºयासारखी पसरताच एका आठवड्यात चारशे कोटी रुपयांच्या ठेवी ग्राहकांनी काढून घेत बँकेला उतरती कळा लावत मोठा धक्का दिला होता. अशा परिस्थितीत प्रशासक भोरिया यांनी बँकेची सुत्रे हाती घेतली होती. दरम्यान ६ जानेवारी २०१८ ला प्रशासक भोरिया यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. मात्र ६ जानेवारी २०१९ पर्यंत भोरिया यांचा कार्यकाळ वाढवून दिला.  दरम्यान, सहकार खात्याने मिलिंद भालेराव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येऊन निवडणूक प्रक्रिया पार पाडली आहे.यापूर्वीचा खर्च वादातमर्चंट बॅँकेच्या सन २००२ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीत तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी ३९ लाखांहून अधिक खर्च केल्याने त्याविरुद्ध मर्चंट बॅँकेच्या तत्कालीन कारभाºयांनी थेट न्यायालयात दाद मागून अतिरिक्त झालेला खर्च जिल्हाधिकाºयांकडून वसूल करण्यात यावा, अशी विनंती केली होती. तब्बल पंधरा वर्षे सदरचा खटला उच्च न्यायालयातून कनिष्ठ न्यायालयात चालल्यानंतर जिल्हा प्रशासनाने झालेल्या खर्चाबाबत स्पष्टीकरण दिले होते व त्यानंतर न्यायालयाने त्याला मान्यता दिली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीवर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाबाबत संचालक मंडळ काय भूमिका घेते याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकbankबँक