मतिमंद मुलांच्या शाळेस स्कूलबस दिली भेट

By Admin | Updated: July 27, 2014 01:53 IST2014-07-27T00:49:56+5:302014-07-27T01:53:50+5:30

मतिमंद मुलांच्या शाळेस स्कूलबस दिली भेट

The mentally challenged children's school gave the school bus | मतिमंद मुलांच्या शाळेस स्कूलबस दिली भेट

मतिमंद मुलांच्या शाळेस स्कूलबस दिली भेट

 

नाशिकरोड : विकास मंदिर मतिमंद मुलांची शाळेचे कार्य अत्यंत स्तुत्य असून, विशेष बालकांना जीवनाच्या प्रवाहात आणण्याचे पुनर्वसनाचे कार्य संस्था नेटाने करीत आहे असे प्रतिपादन एलआयसीचे वरिष्ठ विभागीय महाप्रबंधक डी. साहू यांनी केले.
दत्तमंदिररोड येथील विकास मंदिर मतिमंद मुलांच्या शाळेस एलआयसीच्या गोल्डन ज्युबली फाउंडेशनतर्फे मोफत स्कूलबस भेट देण्यात आली. यावेळी बोलताना साहू म्हणाले की, या बसमुळे विशेष मुलांना लांबून शाळेत येणे-जाणे सोपे होईल. अशा प्रकारच्या समाज उपयोगी संस्थांना गोल्डन ज्युबली फाउंडेशन नेहमीच मदत करीत असतो, असे साहू यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून विपणन व्यवस्थापक आशुतोष प्रसाद, विक्री व्यवस्थापक तेलंगी, मनोज देशपांडे उपस्थित होते. यावेळी डी. साहू यांनी बसच्या किल्ल्या संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरविंद राठोड व मुख्याध्यापक सुहासिनी घोडके यांना सुपूर्द केल्या. यावेळी छाया बैजल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विशेष मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. आभार चक्रनारायण यांनी मानले. यावेळी मायाबेन ठक्कर, शीतल तरेकर आदि उपस्थित होते.

Web Title: The mentally challenged children's school gave the school bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.