वृक्षलागवडीतून कोरोना वीरांचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST2021-06-17T04:11:27+5:302021-06-17T04:11:27+5:30
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक पोलिसांसह आरोग्य, सफाई कर्मचारी, विविध खात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या कोरोना ...

वृक्षलागवडीतून कोरोना वीरांचे स्मरण
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक पोलिसांसह आरोग्य, सफाई कर्मचारी, विविध खात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या कोरोना वीरांना अभिवादन करण्यासह त्यांच्या आठवणी निरंतर राहाव्यात यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्याचा मानस सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी व्यक्त केला. दर आठवड्याला श्रमदान करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर संकल्प प्रत्यक्षात उतरविण्याचा निश्चय केला.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावली व फळे देणाऱ्या झाडांचे रोपण करण्याचे निश्चित झाले. निफाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे तसेच सरपंच कन्हैयालाल भुतडा, माजी सरपंच विजय काटे, सहायक निरीक्षक कोते, पोलीस उपनिरीक्षक व्ही. के. सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
चौकट-
‘कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेक कोरोना वीरांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे स्मरण राहावे यासाठी पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्याचा मानस वरिष्ठांकडे व्यक्त करण्यात आला होता. पोलीस ठाण्याची इमारत व आवार चांगले आहे. येणाऱ्या अभ्यांगतांना सावली होण्यासह कोरोना वीरांच्या स्मृती जागविल्या जातील.
- सागर कोते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वावी
फोटो - १६ सिन्नर पोलीस
सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या आवारात कोरोना वीरांच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे, सहायक निरीक्षक सागर कोते. समवेत विजय काटे, उपनिरीक्षक व्ही. के. सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी.
===Photopath===
160621\16nsk_40_16062021_13.jpg
===Caption===
फोटो - १६ सिन्नर पोलीस सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या आवारात कोरोना योध्दांच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपन करतांना उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे, सहाय्यक निरीक्षक सागर कोते. समवेत विजय काटे, उपनिरीक्षक व्ही. के. सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी.