लोहोणेर : येथील रहिवासी सध्या कळवण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार मधुकर परशराम तारू यांना महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्यासह पोलीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मधुकर तारू यांनी त्यांच्या पोलीस सेवेच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल त्यांच्या कामकाजाची दखल घेऊन पोलीस महासंचालक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार मधुकर तारू यांना सन्मानचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:18 IST