अंनिसचे सदस्य नोंदणी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:30 IST2020-01-24T22:08:58+5:302020-01-25T00:30:27+5:30
सोयगाव येथील मविप्र संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ - वरिष्ठ महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.

सोयगाव येथील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित सदस्य नोंदणी अभियानप्रसंगी डॉ. जयंत पवार, राजेंद्र भोसले, शिल्पा देशमुख, डॉ. राहुल देशमुख व विद्यार्थी.
मालेगाव : सोयगाव येथील मविप्र संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ - वरिष्ठ महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.
महिलांसाठी ८ मार्चला मालेगावमध्ये होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेबाबत चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी मविप्र मालेगाव तालुका संचालक डॉ. जयंत पवार उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. राहुल देशमूख, सतीश पवार, बोरसे, निशा पवार, प्राचार्य डॉ. एच. एम. क्षीरसागर, राष्ट्रवादी मालेगाव शहराध्यक्ष दिनेश ठाकरे उपस्थित होते.
अंनिसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तांत्रिक, मांत्रिक, बुवा-बाबा यांच्यावर अंधपणे विश्वास न ठेवता विज्ञाननिष्ठ होऊन विवेकवादाची कास धरावी. जगातील कोणत्याही घटना घडामोडी मागे कार्यकारणभाव आहे त्यांचा शोध घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.
यावेळी एज्युकेअर फाउण्डेशनच्या अध्यक्ष शिल्पा देशमुख यांनी मार्गदर्शन केले. मालेगाव मध्ये ८ मार्च २०२० ला खास तरुणी व महिलांसाठी खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. अनम्रता जगताप यांचे भाषण झाले. डॉ.जयंत पवार यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. पी. डी. गोणारकर यांनी केले तर शेवटी आभार प्रा. जे. डी. पवार यांनी मानले.