नाशिक : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. मेघा चंद्रसेन रोकडे यांची, तर उपसरपंचपदी शिवसेनेचे वाडीवर्हे गटप्रमुख दिलीप विठोबा मुसळे यांची बिनविरोध निवड झाली. नांदुरवैद्य ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणूक होऊन नऊ सदस्यांची निवड करण्यात आली. सरपंच निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सरपंच व उपसरपंच पदासाठी निर्धारित वेळेत सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने अध्यक्षांनी रोकडे व मुसळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी अरुणा नाडेकर, रेश्मा बोराडे, प्रवीण आवारी,लक्ष्मण मुसळे, यमुनाबाई सायखेडे आदि सदस्यांसह ग्रामसेवक कदम, तलाठी वाघमारे आदि उपस्थित होते. सरपंचपदी निवडीनंतर उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. सरपंचपदी निवड झालेल्या रोकडे यांचे आजोबा शंकराव रोकडे यांची या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर तब्बल चाळीस वर्षांनंतर त्यांच्या नातीची याच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली हे या निवडणुकीचे विशेष.
नांदुरवैद्यच्या सरपंचपदी मेघा रोकडे
By admin | Updated: May 7, 2014 21:33 IST