मराठा क्रांती मोर्चासंदर्भात त्र्यंबक तालुक्यात बैठका
By Admin | Updated: September 12, 2016 01:10 IST2016-09-12T01:07:11+5:302016-09-12T01:10:01+5:30
मराठा क्रांती मोर्चासंदर्भात त्र्यंबक तालुक्यात बैठका

मराठा क्रांती मोर्चासंदर्भात त्र्यंबक तालुक्यात बैठका
त्र्यंबकेश्वर : येत्या २४ सप्टेंबर रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चा नियोजनाबाबत त्र्यंबकेश्वर येथे बैठका घेण्यात आल्या. त्र्यंबकला आतापर्यंत तीन बैठका झाल्या तर तालुक्यातील मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या १७ गावांमध्ये स्वतंत्र बैठका संपन्न झाल्या. त्र्यंबकेश्वरसह तालुक्यातील १७ गावांमधून मोर्चात सहभागी होणारे समाजबांधव कोणत्याही समाजा विरोधात घोषणा देणार नसल्याने हा मोर्चा आदर्शवत ठरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी दिली.
त्र्यंबक तालुक्यातील प्रत्येक पाचशे मोर्चेकरी मागे एक स्वयंसेवक असेल. बैठकीत संपतराव सकाळे, मनोहर मेढे, निवृत्ती लांबे, समाधान बोडके, बहिरू मुळाणे, ज्ञानेश्वर महाले, मनोहर महाले, भूषण अडसरे, दिलीप मुळाणे, नवनाथ कोठुळे, बाळासाहेब बोडके, अॅड. भास्कर मेढे, कैलास मोरे, दिलीप चव्हाण, कैलास चव्हाण, आदि अनेक नेते व कार्यकर्ते तसेच अंबोली, खंबाळे, कोळुजे, अंजनेरी, तळवाडे, शिरसगाव , त्र्यंबकेश्वर, पेगलवाडी, माळेगाव प्रिंंपी, पिंपळद, रोहिले आदि गावातील नेते बैठकीसाठी हजर होते. (वार्ताहर)