भगूर येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

By Admin | Updated: June 29, 2016 00:02 IST2016-06-28T22:22:50+5:302016-06-29T00:02:15+5:30

ति. झं. विद्यालय : १९९४ ची दहावीची बॅच आली एकत्र

Meetings of former students at Bhagur | भगूर येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

भगूर येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

 भगूर : नाशिक एज्युकेशन संस्थेच्या ति. झं. विद्यामंदिर या शाळेच्या इयत्ता १०वी १९९४ च्या बॅचच्या माजी विद्यार्थांचा महामेळावा २२ वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सध्या सोशल मीडियाचे युग असल्याने १९९४ च्या काही विद्यार्थ्यांची भेट झाली आणि व्हाट्स अपच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधला. संवाद झाल्यानंतर मेळावा घेण्याचा विचार पुढे आला. त्यास उदंड असा प्रतिसादही मिळाला. सर्व विद्यार्थी ति. झं. शाळेत जमले होते. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या वर्गात जाऊन बेंचवर बसण्याचा आनंद घेतला. यावेळी परत आपली शाळा भरल्याची जाणीव या सर्वांना झाली. तद्नंतर वर्गाचे व शाळेचे पूजन करून सर्व विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्र म सादर करत आपला परिचय करून दिला. तसेच आपल्या कुटुंबाची व आपण करत असलेल्या कामाबद्दल सर्व वैयक्तिक माहितीही सांगितली. या मेळाव्यासाठी धुळे, कोल्हापूर, मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह विविध शहरांत व विविध क्षेत्रात काम करत असलेले व सध्या या ठिकाणी स्थायिक झालेले विद्यार्थी या मेळाव्यासाठी आले होते. सदर मेळाव्यास शाळेतील अनेक ज्येष्ठ शिक्षकांनीही भेट दिली.
मेळाव्यास रेणुका कातकाडे, विलास बोडके, धनंजय विश्वंभर, प्रमोद आडके, विनोद सोनवणे, अभियंता आश्विनी शिंदे, योगिता कदम, मुकेश लोट, सुखदेव जाधव, राजेंद्र जाधव, भास्कर सोनवणे, प्रशांत कस्तुरे, मंगेश पिंपळे, प्रकाश टिळे, प्रदीप कस्तुरे, सतीश म्हस्के, विनोद जाधव, मनीषा दिवटे, पल्लवी चव्हाण, मनीषा लकारिया, माई कुलथे, अर्जुन सोनवणे, अनिता साळुंखे, रत्नाकर मोहिते, विशाल कातकाडे, दीपक कणसे आदिंसह २५ ते ४० विद्यार्थी सहकुटुंब उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Meetings of former students at Bhagur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.