त्र्यंबकला पाणीपुरवठा योजनेची बैठक

By Admin | Updated: July 27, 2014 00:20 IST2014-07-26T20:33:46+5:302014-07-27T00:20:04+5:30

त्र्यंबकला पाणीपुरवठा योजनेची बैठक

Meeting of Trimbaksh water supply scheme | त्र्यंबकला पाणीपुरवठा योजनेची बैठक

त्र्यंबकला पाणीपुरवठा योजनेची बैठक

 ंत्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्वांत मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे गौतमी गोदावरी (बेझे) ते त्र्यंबकेश्वर पाणीपुरवठा योजना वेगात सुरू असून, ते मार्चअखेर पूर्ण होणार आहे. या संपूर्ण योजनेचा उद्देश पालिका पदाधिकारी यांना माहीत व्हावा
या उद्देशाने बैठक बोलाविली असल्याचे अधीक्षक अभियंता यांनी बैठकीत प्रारंभीच सांगितले. मुख्याधिकारी निवृत्ती नागरे उपस्थित होते.
या योजनेची माहिती देताना देवेंद्र लांडगे म्हणाले, सदर पाणीपुरवठा योजना २४ कोटी ८६ लक्ष रुपयांची असून, सुमारे २५ वर्षे शहरातील वाढत्या वस्तीसह सिंहस्थ कुंभमेळा यात्रा जत्रा व दररोजची येणाऱ्या जाणाऱ्यांची लोकसंख्या लक्षात घेऊनच योजना तयार करण्यात आली. बेझे ते त्र्यंबकेश्वरपर्यंत येण्यासाठी तळवाडे, पिंपळद (त्र्यंबक) व गणपत बारीमार्गे सध्याच्या जलवाहिनी शेजारून निलपर्वताजवळील त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या जागेवर आणले जातील त्यांची लांबी ९२७० मीटर असून, या जागेत २.६० दलघफू क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर आणली जाईल.
यावेळी अधीक्षक अभियंता देवेंद्र लांडगे, कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, उपअभियंता डी. व्ही. सोनवणे आदिंसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शाखा अभियंते उपस्थित होते. तसेच नगराध्यक्षा यशोदाताई अडसरे, उपनगराध्यक्ष ललित लोहगावकर, धनंजय तुंगार, संतोष कदम, अनघा फडके, आशा झोंबाड, माधुरी जोशी, यशवंत भोये, तृप्ती धारणे, पंकज धारणे, सुनील अडसरे, मनोज थेटे, अभिजित काण्णव तसेच पालिका अभियंता प्रशांत जुन्नरे आदि उपस्थित होते. यावेळी अनेक नगरसेवकांनी शंका विचारून माहिती करून
घेतली. (वार्ताहर)

Web Title: Meeting of Trimbaksh water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.