.ंमालेगावी भुजबळ समर्थकांची बैठक

By Admin | Updated: August 30, 2016 00:31 IST2016-08-29T22:54:31+5:302016-08-30T00:31:13+5:30

संगमेश्वर : माळी समाज मंगल कार्यालयात चर्चा

Meeting of the supporters of the pro-Mahalega Bhujbal | .ंमालेगावी भुजबळ समर्थकांची बैठक

.ंमालेगावी भुजबळ समर्थकांची बैठक

संगमेश्वर : येथील माळी मंगल कार्यालयात ओबीसी समाज व भुजबळ समर्थकांची बैठक घेण्यात आली. मालेगाव शहर व तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अ‍ॅड. रमेश मोरे, नगरसेवक सखाराम घोडके, समता परिषदेचे बाळासाहेब बागुल, विनोद शेलार, कैलास तिसगे, सुनील वडगे, माजी आमदार शेख रशीद, धर्मा भामरे, विश्वास माळी, सोमनाथ अहिरराव, विलास बिरारी, मोकभणगीचे नाना शेलार आदिंची भाषणे झाली. छगन भुजबळांवर अधिकाराचा गैरवापर करून कायद्याच्या कचाट्यात अडकविल्याने त्यांना त्वरित सोडविण्याची मागणी उभयतांनी केली. बैठकीस नगरसेवक नरेंद्र सोनवणे, माळी पंच कमेटीचे अध्यक्ष प्रकाश सावकार, माजी नगरसेवक राजाराम जाधव, श्रीराम सोनवणे, आनंदसिंग ठोके, वसंत वारुळे, जितेंद्र खैरनार यांचेसह नागरिक उपस्थित होते. बैठकीनंतर तहसिल कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. जगताप गल्ली, आंबेडकर पुल, शिवाजी पुतळा, मोसमपूलमार्गे तहसीलवर नेण्यात आला. नायब तहसीलदार जगदीश निकम यांना निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Meeting of the supporters of the pro-Mahalega Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.