टाकेद येथे शाहीस्नान पर्वणीनिमित्त बैठक
By Admin | Updated: October 13, 2015 22:36 IST2015-10-13T22:34:55+5:302015-10-13T22:36:08+5:30
टाकेद येथे शाहीस्नान पर्वणीनिमित्त बैठक

टाकेद येथे शाहीस्नान पर्वणीनिमित्त बैठक
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे होणाऱ्या शाहीस्नान पर्वणीसाठीच्या आयोजनाबाबत नुकतीच दुसरी बैठक संपन्न झाली.
सोमवार, दि. २६ आॅक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेला वारकरी संप्रदायाचे शाहीस्नान होणार आहे. महंत डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीस आमदार राजाभाऊ वाजे, निवृत्ती महाराज संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबक
गायकवाड, सरपंच बाळासाहेब घोरपडे, तुकाराम नांगरे, नरहरी मडके, रामचंद्र परदेशी, उपसभापती पांडुरंग पा. वारुंगसे, ट्रस्टी किशोरदास वैष्णव, पुंडलीकराव थेटे.
पंचायत समिती सदस्य हरिदास लोहकरे, बाळासाहेब गाढवे,
संपत काळे, कचरू पा. डुकरे, रतन पा. जाधव, मधुकर कोकणे. विक्रमराजे भांगे, भास्कर महाले
आदि ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
शाहीस्न पर्वणीच्या दिवशी सकाळी नऊ वाजता टाकेद गावातून संत निवृत्तिनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची शाही मिरवणूक काढण्यात येईल. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, साधू-संत, मंहत सहभागी होणार आहेत.
सर्वतीर्थ टाकेद हे रामायणकालीन तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी पूर्वी सिंहस्थाची चौकी होती. येथे रामभक्त भक्तराज
जटायू यांना मोक्ष मिळालेला आहे. यासाठी मागील बारा वर्षांपूर्वी १०/१०/२००३ रोजी पर्वणी झाली होती.
टाकेद पंचक्रोशीतील व जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्वांचाच सहभाग महत्त्वाचा होता. याही वेळेस तालुक्यातील व परिसरातील सर्वच शाही पर्वणीसाठी प्रयत्न करत
आहेत. (वार्ताहर)