कुरैशी समाज बांधवांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:48 IST2017-08-23T00:48:47+5:302017-08-23T00:48:53+5:30
प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधांचा उपयोग करून बकरी ईद सण पारंपरिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन प्रांताधिकारी अजय मोरे यांनी केले. येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कुरैशी बांधवांच्या झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी मोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रादेशिक पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त धनंजय परकाळे होते.

कुरैशी समाज बांधवांची बैठक
मालेगाव : प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधांचा उपयोग करून बकरी ईद सण पारंपरिक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन प्रांताधिकारी अजय मोरे यांनी केले. येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कुरैशी बांधवांच्या झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी मोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रादेशिक पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त धनंजय परकाळे होते. व्यासपीठावर अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.पी. विसावे, एल. व्ही. निकम, डॉ. जावेद खाटीक आदि उपस्थित होते. प्रांताधिकारी मोरे पुढे म्हणाले की, सण हे आनंदासाठी असतात. बकरी ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करावा, प्रशासनाने याबाबतची पूर्व तयारी पूर्ण केली आहे. अपर पोलीस अधीक्षक पोद्दार म्हणाले की, कायद्याच्या चौकटीत राहून कुर्बानीची परंपरा पूर्ण करावी. गोवंशबंदी कायद्याची उल्लंघन करणाºयांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. पोलीस निष्पक्षपातीपणे काम करीत आहेत. गोरक्षेच्या नावाखाली शहरात तणाव निर्माण करणाºयांवर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला आहे. कायदा मोडणाºयांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असे सांगत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केली. यावेळी पोलीस उपअधीक्षक राजमाने, तालुका पशुसंवर्धन अधिकारी कदम, अब्दुल्ला कुरेशी यांनी मनोगत व्यक्त केले. महापालिकेचे एकलाख अहमद यांनी मनपाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. शहरात १४ तात्पुरते कत्तलखाने उभारण्यात येणार आहे. कायमस्वरूपी कत्तलखान्यात कुर्बानी देता येणार आहे. प्रास्ताविक डॉ. खाटीक यांनी केले. बैठकीस पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, कुरेशी समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.