खरीप हंगाम पूर्व तयारीची आढावा बैठक
By Admin | Updated: June 2, 2014 01:56 IST2014-06-02T01:42:33+5:302014-06-02T01:56:19+5:30
मालेगाव : पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात खरीप हंगाम पूर्व तयारीची आढावा बैठक घेण्यात आली.

खरीप हंगाम पूर्व तयारीची आढावा बैठक
मालेगाव : पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात खरीप हंगाम पूर्व तयारीची आढावा बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी आमदार दादा भुसे होते. बैठकीस पं.स. सभापती वंदना पवार, अनिता अहिरे, अण्णा पवार, पं.स. व तालुक्यातील खते-बियाणे, औषध विक्रेते उपस्थित होते. प्रारंभी तालुका कृषी अधिकारी भास्करराव निकम यांनी कृषी विभागाकडील योजनांचे नियोजनाची माहिती दिली. कृषी अधिकारी अहिरे खरीप हंगामाचे क्षेत्र त्यासाठी लागणारे खते बियाणेंचे नियोजनाची माहिती दिली. भुसे यांनी विक्रेत्यांकडील खते बियाणेंचा आढावा घेऊन त्यांच्या अडचणी मांडण्याची सूचना केली. बाळासाहेब शिरसाठ यांनी मालेगाव येथे महाबिजचे कार्यालय व कायमस्वरूपी अधिकारी नेमण्यात यावा, आर. सी. एफ. खत कंपनीकडून जिल्ह्यास व तालुक्यास युरीरा १५-१५-१५, २०-२०-० ही खते जास्त प्रमाणात दिली जावीत. युरिया खतासोबत विद्राव्य खते घेण्याची सक्ती करु नये. औषधांच्या बाबतीत औषध कंपन्यांकडून मूळ प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे विक्रेत्यांना ही औषधे विक्री करता येत नाही. तालुक्यात प्रमुख विक्रेत्यांप्रमाणे ग्रामीण भागातील विक्रेत्यांनाही खते, बियाणे औषधे वेळेवर उपलब्ध होत नाही. जादा भावाने या कृषी निविष्टा द्याव्या लागतात. त्यामुळे शेतकर्यांना माल विक्रीस अडचण येते. महाबिजचे एन.५३ कांद्याचे बियाणे अॅडव्हान्स देऊनही हे बियाणे मिळत नाही. महाबिजचे अधिकारी बियाणे तालुक्यातील विशिष्ट विक्रेत्यालाच दिले जाते व त्यांच्यामार्फत भरमसाठ नफा घेऊन विक्री केली जाते. या प्रकाराची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी तक्रार मांडल्या. दुष्काळ व अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी हैराण झाला आहे. या परिस्थितीचे भान ठेवून कापूस, मका इत्यादी बियाणे उत्तम दर्जाचे व रास्त भावात द्यावी. त्यांना लागणारा रासायनिक खतांचा तुटवडा पडू देऊ नये, असे आवाहन पं.स. सभापती वंदना पवार यांनी केले. यावेळी आमदार भुसे यांनीही मार्गदर्शन केले.