शाहीस्नानाच्या नियोजनासाठी बैठक

By Admin | Updated: September 22, 2015 22:33 IST2015-09-22T22:32:36+5:302015-09-22T22:33:07+5:30

शाहीस्नानाच्या नियोजनासाठी बैठक

Meeting for the planning of Shahisanana | शाहीस्नानाच्या नियोजनासाठी बैठक

शाहीस्नानाच्या नियोजनासाठी बैठक

सर्वतीर्थ टाकेद : येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाहीस्रानाच्या नियोजनासाठी परिसरातील ग्रामस्थांनी सोमवारी (दि.२८) बैठकीचे आयोजन केले आहे. इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील जटायू सर्वतीर्थाला अनन्य साधारण महत्त्व आहे. जटायूला येथेच मोक्ष मिळाला आहे. जटायूला मोक्ष मिळावा म्हणून श्रीरामाने येथे बाण मारून तीर्थ बोलावले होते. आजही ते सतत वाहत असल्याने या ठिकाणी स्नान करण्यासाठी भारतातून भाविक येत असतात. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून तीर्थक्षेत्राचा विकास केला आहे.
या तीर्थक्षेत्री पूर्वी कुंभमेळा भरत होता, असे जाणकार सांगतात. परंतु कालपरत्वे तो बंद झाला. परंतु महंत डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सिंहस्थ पर्वकालानिमित्ताने वारकरी संप्रदायाचे श्रीगुरू सोपानदास महाराज यांच्या समवेत गेल्या कुंभमेळ्यात सर्वतीर्थ येथे शाहीस्नानाचे आयोजन केले होते. टाकेद येथील भाविकांनी महंत लहवितकर महाराज यांची भेट घेऊन शाहीस्नानाच्या नियोजन करण्यासाठी बैठक बोलावली आहे. सोमवारी (दि. २८) बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, ग्रामस्थांनी व भाविकांनी उपस्थित राहवे असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Meeting for the planning of Shahisanana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.