डांगसौंदाणे येथे नियोजनासाठी बैठक
By Admin | Updated: September 22, 2016 00:26 IST2016-09-22T00:25:27+5:302016-09-22T00:26:21+5:30
डांगसौंदाणे येथे नियोजनासाठी बैठक

डांगसौंदाणे येथे नियोजनासाठी बैठक
डांगसौंदाणे : नाशिक येथे २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठा क्र ांती मोर्चाच्या नियोजनासाठी येथील श्रीराम मंदिरात बैठक घेण्यात येऊन मार्चात मोठ्या संख्येने सहभागी होणाचा निर्धार करण्यात आला.
यावेळी तुळजाभवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी उपस्थितांना मोर्चाच्या नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. मराठा समाजबांधव व सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते एकत्र येणार असल्यामुळे मोर्चास महत्त्व प्राप्त झाले आहे. मार्चाला कुठल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे ठरविण्यात आले. परिसरातून जास्तीत जास्त पुरु ष व महिला, तरुणांनी मोर्चात सहभाग नोंदवावा, असे आवाहन सोनवणे यांनी यावेळी केले. नाशिक येथील मराठा क्र ांती मोर्चात सहभागी होण्यासाठी डांगसौंदाणे गावातून वाहनांची व्यवस्था केली आहे, असे सांगण्यात आले. यासाठी अनेक समाजबांधवानी आपली वाहने मोफत उपलब्ध करुन द्यावी असे ठरविण्यात आले.
येत्या बुधवारी (दि.२२) कोपर्डी घटनेतील पीडित मुलीस व उरी येथील चकमकीत शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी कॅण्डल मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, कॅण्डल मार्चसाठी जास्तीतजास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. शेवटी उरी येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
बैठकीसाठी सोपान सोनवणे, अंबादास सोनवणे, महेंद्र सोनवणे, उदय सोनवणे, रवींद्र सोनवणे, आमोल सोनवणे, राकेश सोनवणे, राजेंद्र सोनवणे, सुशीलकुमार सोनवणे, हरी बोरसे, सागर चिंचोरे, तुषार बाविस्कर, महेश बोरसे, साहेबराव बोरसे, उमेश सोनवणे, महेश सोनवणे, निवृत्ती सोनवणे, मुन्ना सोनवणे, कडू सोनवणे, सचिन सोनवणे, संदीप सोनवणे, दीपक खैरनार, विजय सोनवणे, योगेश सोनवणे, बबलू सोनवणे आदिंसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)