भुजबळ समर्थनार्थ मोर्चा नियोजनाबाबत बैठक

By Admin | Updated: October 1, 2016 00:24 IST2016-10-01T00:23:41+5:302016-10-01T00:24:24+5:30

भुजबळ समर्थनार्थ मोर्चा नियोजनाबाबत बैठक

Meeting for the planning of Bhujbal support | भुजबळ समर्थनार्थ मोर्चा नियोजनाबाबत बैठक

भुजबळ समर्थनार्थ मोर्चा नियोजनाबाबत बैठक

संगमेश्वर : माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात येथे चौकसभा घेण्यात आली. नवा होळी चौक, सावतानगर, ज्योतीनगर, सुभाष चौक, कलेक्टरपट्टा, महादेव मंदिर आदि भागात झालेल्या चौकसभांमध्ये अ‍ॅड. रमेश मोरे, श्रीराम सोनवणे, समता परिषदेचे अशोक सावकार, कैलास तिसगे, राजाराम जाधव यांनी मार्गदर्शन केले. मूक मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसह मागासवर्गीय बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगरसेवक नरेंद्र सोनवणे यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Meeting for the planning of Bhujbal support