शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ब्रह्मगिरी उत्खननस्थळी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची भेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 22:12 IST

त्र्यंबकेश्वर : आमदार हिरामण खोसकर यांच्यासह नायब तहसीलदार (प्रशासन), नाशिकहून आलेले पर्यावरणप्रेमी ब्रह्मगिरी उत्खनन टास्क फोर्सचे सदस्य त्र्यंबकेश्वरचे पर्यावरणप्रेमी ललित लोहगावकर, भूगर्भतज्ज्ञ डॉ. निकम, मनीष बावीस्कर, मंडलाधिकारी सुयोग वाघमारे, तलाठी संतोष जोशी, देवचंद महाले, गौरव पवार आदींसह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी ब्रह्मगिरी उत्खननस्थळाची पाहणी केली.

ठळक मुद्देभूस्खलनामुळे काही भाग कोसळलेला दिसत आहे.

त्र्यंबकेश्वर : आमदार हिरामण खोसकर यांच्यासह नायब तहसीलदार (प्रशासन), नाशिकहून आलेले पर्यावरणप्रेमी ब्रह्मगिरी उत्खनन टास्क फोर्सचे सदस्य त्र्यंबकेश्वरचे पर्यावरणप्रेमी ललित लोहगावकर, भूगर्भतज्ज्ञ डॉ. निकम, मनीष बावीस्कर, मंडलाधिकारी सुयोग वाघमारे, तलाठी संतोष जोशी, देवचंद महाले, गौरव पवार आदींसह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी ब्रह्मगिरी उत्खननस्थळाची पाहणी केली.यावेळी जेथे ब्लास्टिंग केले तेथील काही भाग उत्खनन केल्याने व नंतर झालेल्या जिलेटिन्स कांड्याच्या ब्लास्टिंगमुळे झालेल्या भूस्खलनामुळे काही भाग कोसळलेला दिसत आहे. यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी भविष्यात संपूर्ण सुपलीची मेटेला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या लोकांचा जीव वाचविण्यासाठी त्यांचे वेळीच स्थलांतर होणे गरजेचे आहे, असे सांगितले. या ठिकाणी असलेला वॉचमन कोणालाच आत प्रवेश करू देत नव्हता. पण आमदार खोसकर, नायब तहसीलदार निकम, टास्क फोर्सचे सदस्य आले असल्याचे सांगितल्यानंतर त्याने आत सोडले. माजी नगराध्यक्ष ललित लोहगावकर यांनादेखील प्रवेश नाकारण्यात आला होता.ब्रह्मगिरी उत्खननप्रकरणी अत्यंत अवघड घटना घडत असल्याने खोसकर यांनी रविवारी शासकीय सुटी असतानाही अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यामुळे आता या प्रकरणाला चालना मिळेल अशी चर्चा आहे. यावेळी सुपलीची मेट येथील रहिवाशांनी आमदारांची भेट घेऊन डिसेंबर २०२० मध्ये टेकड्या सपाटीकरण करण्याचे काम सुरू असताना तहसीलदारांना निवेदन दिले होते तरी निवेदनाचा गांभीर्याने विचार केला नाही. विशेष म्हणजे जिलेटिनच्या ८०० कांड्या तेथे पोहोचतात आणि असे ब्लास्टिंग करतात. यामुळे डोंगराच्या पाषाणाला तडे गेले असून, पावसाळ्यात पाणी झिरपते. त्यामुळे भूस्खलनामुळे सुपलीच्या मेटेला कधीही धोका पोहचू शकतो, असे भुगर्भतज्ज्ञ डॉ. निकम यांनी सांगितले.एखाद्या गरीब शेतकऱ्याने जमीन सपाटीकरण करण्याचा प्रयत्न केला तर रात्री-बेरात्री खनिज ट्रक जप्त होतात. काम बंद पाडले जाते. तर मग येथील सुरुंगाच्या आवाज ट्रक, पोकलेन, जेसीबीचा धडधडाट सरकारी यंत्रणेला ऐकू कसा आला नाही, असा सवाल आमदार खोसकर यांनी करत वनविभाग व महसुली यंत्रणेच्या कारभारावर निशाणा साधला. (२६ त्र्यंबक १ ,२)

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरMLAआमदार