चांदवडला राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:18 IST2021-08-19T04:18:05+5:302021-08-19T04:18:05+5:30

२०२४ मध्ये हाेणारी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची असल्याचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी ...

Meeting of NCP Youth Congress at Chandwad | चांदवडला राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक

चांदवडला राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक

२०२४ मध्ये हाेणारी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची असल्याचे प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी सांगितले. यावेळी चांदवड-देवळा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करू, असे आश्वासन शेख यांनी दिले. बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक उपस्थित होते. यावेळी चांदवड तालुक्यातील युवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे आयोजक चांदवड तालुका अध्यक्ष दत्तात्रेय वाकचौरे यांनी स्वागत केले. यावेळी सुनील कबाडे, विजय जाधव, प्रकाश शेळके, ॲड. नवनाथ आहेर, भूषण शेळके, रिजवान घासी, विजय गांगुर्डे आदींसह चांदवड तालुक्यातील युवक उपस्थित होते.

फोटो- १८ चांदवड राष्ट्रवादी

चांदवड येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष महेबूब शेख. समवेत ॲड. रवींद्र पगार, पुरुषोत्तम कडलक, सुनील कबाडे, दत्तात्रय वाकचौरे, प्रकाश शेळके, विजय जाधव, नवनाथ आहेर, रिजवान घासी व नेते दिसत आहेत.

---------------------------------------------------------------------

180821\18nsk_8_18082021_13.jpg

फोटो- १८ चांदवड राष्ट्रवादी 

Web Title: Meeting of NCP Youth Congress at Chandwad