शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

बागलाण पंचायत समितीमध्ये  सभापतींसह सदस्यांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:50 IST

बागलाण पंचायत समितीमध्ये जनहिताची कामे होत नाहीत तसेच महत्त्वाची माहिती सदस्यांपासून दडवली जाते. याला गटविकास अधिकारीच जबाबदार असून, त्यांच्यावर निष्क्रि यतेचा ठपका ठेवत सभापतींसह सदस्यांनी सभात्याग केला.

सटाणा : बागलाण पंचायत समितीमध्ये जनहिताची कामे होत नाहीत तसेच महत्त्वाची माहिती सदस्यांपासून दडवली जाते. याला गटविकास अधिकारीच जबाबदार असून, त्यांच्यावर निष्क्रि यतेचा ठपका ठेवत सभापतींसह सदस्यांनी सभात्याग केला. पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रभारी गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.  दरम्यान प्रभारी गटविकास अधिकारी पाटील कार्यालयीन काळात कधीच येत नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेची कामे रखडली आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यभार काढून पूर्णवेळ गटविकास अधिकारी देण्यात यावा या मागणीसाठी सर्व पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेऊन साकडे घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.  येथील पंचायत समितीच्या सभागृहात सभापती विमल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मागील सभेतील तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची माहिती सादर करण्याची मागणी गटविकास अधिकाºयांकडे केली होती. मात्र प्रभारी गटविकास अधिकारी पाटील यांनी माहिती देण्यास असमर्थता दाखिवल्याने अधिकारी व पदाधिकाºयांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी संतप्त पदाधिकाºयांनी थेट गटविकास अधिकारी पाटील यांना आरोपीच्या पिंजºयात बसविण्याचा प्रयत्न केला. निष्क्रिय गटविकास अधिकाºयामुळे तालुक्यातील जनहिताची कामे रखडल्याचा आरोप केला. गटविकास अधिकाºयाचा वचक नसल्यामुळेच खातेप्रमुख दांड्या मारतात. वनविभाग, तालुका कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज महावितरण कंपनी, आगार व्यवस्थापक, लागवड अधिकारी, स्थानिकस्तर आदी महत्त्वाच्या खातेप्रमुखांनी दांडी मारल्याचे आढळून आले.याला गटविकास अधिकारी पाटील यांनाच जबाबदार धरत संतप्त पदाधिकाºयांनी सभात्याग केला. यावेळी सभापती सोनवणे यांच्यासह उपसभापती शीतल कोर, गटनेते अतुल अहिरे, माणिक अहिरे, सुनीता अहिरे, वसंत पवार, वैशाली महाजन, कान्हू अहिरे, संजय जोपळे आदीं सदस्यांनी सभात्याग केला.गटविकास अधिकारी येतात सुटी झाल्यावरदेवळ्याचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून बागलाणचा अतिरिक्त पदभार आहे. मात्र सहा महिन्यात पाटील कधीच कार्यालयीन वेळेवर आले नसल्याचे गटनेते अतुल अहिरे यांनी निदर्शनास आणून दिले. ते सायंकाळी ५ वाजता येतात. कार्यालयीन वेळेत येत नसल्यामुळे तालुक्यातून आलेल्या जनतेची कोणतीही कामे होत नाहीत. पदाधिकाºयांनादेखील पंधरा पंधरा दिवस गटविकास अधिकारी पाटील येत नाहीत. यामुळे जनहीताची कामे होत नाहीत. बैल व शेळी गोठ्याची प्रकरणे रखडली आहेत.शौचालय बांधकामांची बिलेदेखील प्रलंबित आहेत. अशा निष्क्रि य अधिकाºयाचा पदभार काढून घ्यावा व त्यांच्या ठिकाणी पूर्णवेळ गटविकास अधिकाºयाची नेमणूक करावी या मागणीसाठी आपण जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेऊन कैफियत मांडणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती