भद्रकालीत मराठा समाजाची बैठक
By Admin | Updated: September 20, 2016 02:00 IST2016-09-20T01:59:45+5:302016-09-20T02:00:17+5:30
भद्रकालीत मराठा समाजाची बैठक

भद्रकालीत मराठा समाजाची बैठक
नाशिक : कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ शहरातून २४ सप्टेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होताना नागरिकांनी तपोवन येथेच जमावे, असे आवाहन उत्तमहिरा सभागृहात येथे सोमवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले.
या बैठकीत कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यात आला. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आदिविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच मोर्चात सहभागी होताना समाजबांधवांसाठीची नियमावलीवरही यावेळी चर्चा झाली.
मोर्चादरम्यान कोणत्याही प्रकारे घोषणाबाजी करू नये, सेल्फी काढू नये व दुसऱ्यास त्रास होईल, असे अक्षेपार्ह वर्तन करून नये अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. यावेळी प्रकाश चव्हाण, अविनाश वाळुंजे, हिरामण वाघ, भूषण काळे, मनोहर शिरसाठ, अरुण मोरे, पुंडलिक घुले, ज्ञानेश्वर पळसकर, अरुण भवर, शरद प्रभाणे, रामकृष्ण मोरे, हेमंत जगताप आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)