दि वणी मर्चंट बँकेची सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:16 IST2021-09-26T04:16:47+5:302021-09-26T04:16:47+5:30

बँकेच्या मुख्य कार्यालयातील किसनलाल बोरा सभागृहात अध्यक्ष रिकबचंद बाफणा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत इतिवृत्त वाचन तसेच अहवाल वाचन ...

The meeting of Diwani Merchant Bank is in full swing | दि वणी मर्चंट बँकेची सभा उत्साहात

दि वणी मर्चंट बँकेची सभा उत्साहात

बँकेच्या मुख्य कार्यालयातील किसनलाल बोरा सभागृहात अध्यक्ष रिकबचंद बाफणा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत इतिवृत्त वाचन तसेच अहवाल वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार घीया यांनी केले. बँकेचे भागभांडवल १ कोटी ३९ लाख ४६ हजार तर ठेवी ६८ कोटी ५९ लाख ७८ हजारांच्या आहेत. बँकेने विविध बँकात ४७ कोटी ४९ लाख २८ हजारांची गुंतवणूक केलेली असून २३ कोटी ५६ लाख ४७ हजारांचे कर्ज वितरण केले आहे. संस्थेच्या व्यवहारात मागील वर्षाच्या तुलनेत भरीव वाढ झाल्याने तसेच संस्थेने सभासदांच्या व खातेदारांना बँकेशी संलग्न असलेल्या सुविधा एनईएफटी, आरटीजीएस, जीएसटी कर भरणा, उत्पन्न कर भरणा, वीज बिल भरणा, एसएमएस सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष बाफणा यांनी दिली. संस्थेची थकबाकी अल्प असल्याने एनपीअेचे प्रमाण शून्य असल्याचे तसेच संस्थेस अ ऑडिट वर्ग मिळाल्याचे उपाध्यक्ष हिदायत मुल्ला यांनी सांगितले आहे. सभासदांचे स्वागत संचालक महेंद्र बोरा यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. महेंद्र भुतडा यांनी तर आभार संचालक विलास कड यांनी मानले. यावेळी बँकेचे संचालक सुभाष खाबिया, अशोक बागमार, प्रकाश सोनवणे, संजय वाघ, नरेद्र खांडे, अनिता देशमुख, मनीषा वडनेरे, दौलत गावीत, अशोक मोदी, दिनेश सोनवणे, कमलाकर आहेर, विजय बोथरा, प्रकाश बोरा, पारसमल सिसोदिया, शांतिलाल चोपडा तसेच नामदेवराव घडवजे, आर. एल. पाटील, पंढरीनाथ सोनवणे, किशोर बोरा, विलास घडवजे, विलास निरगुडे आदींसह सभासद उपस्थित होते.

250921\25nsk_41_25092021_13.jpg

वणी मर्चंट बँकेची वार्षिक सभा

Web Title: The meeting of Diwani Merchant Bank is in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.