सिडकोत मराठा समाजाची बैठक
By Admin | Updated: September 22, 2016 01:41 IST2016-09-22T01:40:43+5:302016-09-22T01:41:06+5:30
मूक मोर्चा : महिला, युवकांना सहभागी होण्याचे आवाहन

सिडकोत मराठा समाजाची बैठक
सिडको : नाशिक येथे शनिवारी (दि. २४)होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सिडकोसह अंबड, मोरवाडी, कामटवाडे भागातून जास्तीत जास्त महिला व युवकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
कोपर्डीतील पाशवी बलात्कार व हत्त्येच्या निषेधार्थ तसेच आरक्षण अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा या मागणीसाठी सिडको कामटवाडे येथील मथुरा मंगल कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीप्रसंगी नाशिक येथे शनिवारी (दि. २४) होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सूचना देण्यात आल्या. तसेच समाजबांधवांनी एकजूट दाखवत त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे तसेच महिला व युवकांनी सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच येत्या शनिवारी कामटवाडे परिसरातील नागरिकांनी सामूहिकरीत्या एकत्रित येऊन मारुती मंदिर कामटवाडे गाव येथे उपस्थित राहून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात
आले. प्रास्ताविक भाऊसाहेब मटाले, रवि मटाले यांनी तर मोर्चाचे नियोजन व सूचनांबाबत भिका मटाले यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीप्रसंगी दिनकर मटाले, शांताराम मटाले, नारायण मटाले, दीपक मटाले, अनिल मटाले, छगन बंदावणे, बाळासाहेब साळुंखे, बाजीराव मटाले, सुभाष गायकर, खंडू मालुंजकर, कारभारी मोरे, बाळासाहेब मटाले, विशाल मटाले, शरद खुटवड, मनोज मटाले, सचिन मटाले, दामोदर मटाले, तुकाराम मटाले, शंकरराव मटाले आदिंसह कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)