फसवल्या गेलेल्या द्राक्ष उत्पादकांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:42+5:302021-07-09T04:10:42+5:30

तहसीलदारांच्या दालनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण, तहसीलदार पंकज पवार, द्राक्ष उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी ...

Meeting of cheated grape growers | फसवल्या गेलेल्या द्राक्ष उत्पादकांची बैठक

फसवल्या गेलेल्या द्राक्ष उत्पादकांची बैठक

तहसीलदारांच्या दालनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण, तहसीलदार पंकज पवार, द्राक्ष उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन कड यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली. भविष्यात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. यावर उपाययोजना करण्यासंदर्भात तसेच ज्या शेतकऱ्यांची फसवणूक व्यापाऱ्यांनी केली आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंबंधी रूपरेषा तयार करण्यात आली. शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना कायदेशीररीत्या मिळाले पाहिजे तसेच तक्रारदार शेतकऱ्यांशी पोलिसांनी सहानुभूतीने वागले पाहिजे, असा आग्रह प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी धरला. यावेळी तहसीलदार पंकज पवार यांनी लवकरच सकारात्मक पावले उचलली जातील व संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासित केले. यावेळी एकनाथ पाटील, सतीश पाटील, चेतन पाटील, भास्कर पताडे, पोपट पाटील, भाऊसाहेब ढगे, प्रवीण बोरस्ते आदी शेतकरी उपस्थित होते.

कोट....

वर्षानुवर्ष नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांचे पैसे बुडवले तरी आपले काहीच होत नाही असा मोठा गैरसमज व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. यामुळे प्रशासनाने या दरोडेखोरांवर कठोर कारवाई केली पाहिजे. जर प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे तरी दुसरा पर्याय नाही.

- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना

Web Title: Meeting of cheated grape growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.